गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६, ०८:३७ PM
मुखपृष्ठ › आमच्याविषयी

आमच्याविषयी

आपलं नाशिक.. स्मार्ट नाशिक..

देशाच्या नकाशावर नाशिकला सर्वच दृष्टीने अन्यय साधारण महत्त्व आहे. तीर्थ नगरी, उद्योग नगरी, संतांची भूमी, कुंभ नगरी, एच ए एल सरकार देशाच्या संरक्षण व्यवस्थेला मजबूत करणारा विमान निर्मितीचा कारखाना, कांदा, द्राक्ष असो की अलीकडे वाईननगरी म्हणून नाशिकची ओळख विस्तारित आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दक्षिणगंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी ही नासिक मधून उगम पावलेली आहे. शेजारील जिल्ह्यांना जलसमृद्ध करणारी धरणेही नाशिकमध्ये सर्वाधिक आहे.

अलीकडेच मुंबई पुण्यानंतर नाशिक मधील विकासाचा वेग वाढला आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मजबूत करणारी मेट्रोची घंटा देखील लवकरच वाजणार आहे. सीएनजी आणि इलेक्ट्रिकल बसेस शहरात दाखल झाले आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्ते वीज पाणी अशा सर्व समस्यांना मुक्त करणारी हजारो कोटी रुपयांची कामे आता नाशिकचा चेहरा बदलत आहे.

विकासाच्या वाटा विस्तीर्ण होत असताना एक मात्र प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

Nashik Ghat

? हे सर्व करताना

  • ✔ खरोखरच नासिककरांचा विकास होत आहे का?
  • ✔ त्यांना अपेक्षित विकासाची व्याख्या काय?
  • ✔ त्यांचे मूलभूत प्रश्न,सामाजिक गरजा, रोजगार याबाबत शासन प्रशासनाची भूमिका काय?
  • ✔ विकासाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये नाशिककरांच्या आचार विचारांना स्थान दिले जात आहे का?
  • ✔ सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा आवाज विचारात घेतला जात आहे का?

"

या सर्व प्रश्नांचा विचार करून आम्ही नाशिकच्या जनतेचा आवाज राज्यकर्त्यांपर्यंत बुलंदपणे पोहोचवणे या एकमेव उद्देशामधून 'आपलं नाशिक'ची स्थापना केली आहे. यापुढे नाशिककरांचा आवाज २४ तास मांडणे हाच या वृत्तवाहिनीचा मुख्य उद्देश आहे. भ्रष्ट प्रवृत्तींना लगाम लावताना शासनाच्या सकारात्मक योजना लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यामधील त्रुटी दूर करून सर्वसामान्य नाशिककरांचा विकास करणे हा आमचा अजेंडा असेल.

नाशिकमधील रियल इस्टेट, इंडस्ट्री, लहान मोठे उद्योग, महिला व युवा वर्गाची सुरक्षा आणि भविष्य, ज्येष्ठांच्या हक्कांचे संवर्धन आणि रक्षण या सर्वांचा आवाज बुलंद करणे हे आमचे ध्येय आहे. आपलं नाशिक ही वृत्तवाहिनी समाजातील पीडित,दबलेल्या, शोषित घटकांचा आवाज आहे

बातम्यांसाठी संपर्क क्रमांक:

+९१-९७७५२१३०००

(या क्रमांकावर फोन करू नये. व्हाट्सअप अकाउंटवर आपली बातमी, व्हिडिओ, लाईव्ह लोकेशन सह स्वतःच्या छायाचित्रासह अपलोड करणे, स्वतःचा संपर्क क्रमांक देखील उपलब्ध करून देणे.)

जाहिरातीसाठी संपर्क क्रमांक:

+९१-९७७५३१३०००

धन्यवाद,
भूषण महाले,
मुख्य संपादक.
मोबाईल क्रमांक: ९७६७६४८८६०