नाशिकच्या सातपूर विभागीय कार्यालयासमोरील मुख्य गुरुत्ववाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने बुधवार, २९ जुलै रोजी सातपूर आणि नाशिक पश्चिम विभागातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेतले आहे. दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे संबंधित भागांतील पाणीपुरवठा नियोजित वेळेत होऊ शकणार नाही.

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दुरुस्तीच्या कामाचा परिणाम गुरुवारी सकाळच्या पाणीपुरवठ्यावरही होण्याची शक्यता आहे. त्या दिवशी संबंधित भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ शकतो.

या गळतीमुळे सातपूर, स्वारबाबानगर, कांबळेवाडी, गौतम नगर, महादेव नगर, कामगार नगर, महात्मानगर, लव्हाटे नगर यांसह विविध परिसरातील नागरिकांवर परिणाम होणार आहे.