पावसाळ्यात पर्यटकांचे आकर्षण असलेल्या हरिहर गडावर आता पर्यटनासाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. प्रतिकूल हवामान आणि गडाची अवघड चढाई लक्षात घेता पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने हा निर्णय घेतला आहे.
पावसामुळे हरिहर गडावरील पायवाटा आणि दगड निसरडे होत असल्याने घसरण्याचा आणि दुर्घटना होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत गडावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.
हरिहर गडाची चढाई अवघड स्वरूपाची असल्याने पावसाळ्यात ही चढाई अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत पर्यटकांना गडावर पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
वनविभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. पर्यटकांनी प्रवेशबंदीचे पालन करून आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
याबाबत त्र्यंबकचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांनी अधिक माहिती दिली आहे


