नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांची तपासणी करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंधरा रुग्णालयांना नोटिसा बजावल्या आहेत. तपासणीदरम्यान तीन रुग्णालयांवर कारवाई करण्यात आली.

रुग्णालयांमध्ये दरपत्रक नसणे, मंजूर क्षमतेपेक्षा अधिक खाटा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि अग्निसुरक्षेसह विविध बाबींची तपासणी करण्यात आली. त्रुटी दूर करण्यासाठी महिन्याची मुदत देण्यात आली असून, सुधारणा न केल्यास पुढील कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.