नाशिकमधील गोदावरी नदीपात्रात टाळकुटेश्वर पुलाजवळ शेकडो मासे मृत अवस्थेत आढळल्याची घटना समोर आली आहे. प्रदूषित पाणी, सांडपाणी मिसळणे आणि पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण घटणे ही संभाव्य कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, गोदाघाटावर स्वच्छता मोहीम सुरू असून नदीच्या पाण्याची पातळीही घसरल्याचे सांगितले जात आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.