नाशिकच्या कामटवाडे परिसरातील इंद्रानगरीत पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांनी महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे, अंबड परिसरात केमिकलयुक्त पाण्यामुळे नागरिक आधीच त्रस्त असताना आता पाण्यात अळ्या आढळल्याने संताप व्यक्त केला जात आहे.