नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी २० ऑक्टोबरची डेडलाईन देण्यात आली असून, सुरक्षा, आरोग्य आणि व्यवस्थापनासाठी २९ विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
या तयारीच्या पार्श्वभूमीवर १७ ऑक्टोबरला विशेष ग्रामसभा, २० ऑक्टोबरला कुंभध्वज उपक्रम, २५ ऑक्टोबरला शंखनाद उपक्रम आणि ३० ऑक्टोबरला संयुक्त पाहणी होणार आहे. ३१ ऑक्टोबरला मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडणार असून, सायंकाळी भव्य गोदावरी आरती होणार आहे.


