नाशिकमधील टीसीएस प्रकरणात महत्त्वाची न्यायालयीन घडामोड घडली आहे. हा खटला नाशिकरोड न्यायालयातून नाशिक सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. प्रकरणात विनयभंग आणि धर्मांतराचे आरोप असून, दानिश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाला. इतर संशयितही न्यायालयात उपस्थित होते.
खटल्यातील युक्तिवादाला सुरुवात झाली असून, पुढील सुनावणी एकोणीस ऑक्टोबरला होणार आहे.


