पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी १३.८४ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात ७७७ गावे आणि १२८७ वाड्यांचा समावेश असून, पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यावर विशेष भर देण्यात येणार असून, त्यासाठी ११.१५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, गरजेनुसार खासगी विहिरींचे अधिग्रहण आणि उपलब्ध जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याचे नियोजन आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी एकूण नऊ उपाययोजनांचा समावेश असून, त्यांची अंमलबजावणी तीन टप्प्यांत केली जाणार आहे. तेरा तालुके दुष्काळी घोषित करण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.