नवरात्रोत्सवापूर्वी कांद्याच्या घाऊक दरात १५ टक्के घसरण झाली आहे. तीन राज्यांतून आवक वाढल्याने बाजारात कांदा स्वस्त झाला असून, सरकारकडून बफर साठ्यातील कांद्याचा पुरवठाही सुरू आहे. दसऱ्यापर्यंत किरकोळ दर ४० रुपयांवर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.