शालार्थ प्रणालीतील त्रुटींमुळे ४२८ शिक्षकांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन रखडले आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षण विभागाला ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली असून, आता अवघे २५ दिवस शिल्लक आहेत.

यू-डायस आणि जन्मतारखांमधील चुका, तसेच अतिरिक्त शिक्षक समायोजनामुळे वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण होणार का? नोव्हेंबरपासून वेतन नियमित करण्याची मागणी होत आहे.