सुजात आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत, आंदोलनांना घाबरून राजधानी बंद पाडल्याचा आरोप केला आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाची जागा बंद केल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी देशातील लोकशाही आणि संविधानाच्या स्थितीवरही प्रश्न उपस्थित केले.
यावेळी तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबतही सुजात आंबेडकर यांनी भाष्य केले. राजकीय लाँचिंगपेक्षा तळागाळातील कार्यकर्ते उभे करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे जगण्याचा अधिकार मिळाल्याचे सांगत येवला मुक्तीभूमीच्या निर्णयाचे महत्त्वही अधोरेखित केले.


