नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात उद्या केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेत्री स्मिता तांबे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, अध्यक्षस्थानी संजीव सोनवणे असणार आहेत.

या महोत्सवात आठ विभागांतील विद्यार्थी सहभागी होणार असून, पाच प्रकारांत विविध स्पर्धा रंगणार आहेत. गंगापूर धरणालगत होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता, तर पारितोषिक वितरण दुपारी चार वाजता होणार आहे. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळणार असून, ‘इंद्रधनुष्य २०२६’साठी विद्यार्थ्यांची निवडही केली जाणार आहे.