नाशिकमधील पवित्र कपालेश्वर मंदिर परिसरात काही मद्यपींनी दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याची घटना समोर आली आहे. मंदिर परिसरात गोंधळ घालत असताना घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांशीही त्यांनी हुज्जत घातल्याचं सांगण्यात येत आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, संबंधितांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक केली. याशिवाय पोलिसांना शिवीगाळ करत गोंधळ घातल्याची माहिती आहे.
पवित्र धार्मिक स्थळाच्या परिसरात मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालण्यासोबतच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेतली जात आहे. या प्रकारामुळे मंदिर परिसरातील सुरक्षेचा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.
घटनेनंतर पोलिसांकडून संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.


