सावतानगर, नाशिक : नाशिकच्या सावतानगर परिसरात नवरात्रोत्सवादरम्यान गरबा पाहण्यासाठी गेलेल्या युवकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सागर एखंडे हा युवक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जुन्या भांडणातून दोन ते तीन युवकांनी त्याच्यावर हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे.

जुन्या भांडणातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती

सावतानगर परिसरात नवरात्रोत्सव सुरू असताना गरबा पाहण्यासाठी गेलेल्या सागर एखंडे याच्याशी काही युवकांनी जुन्या भांडणावरून वाद घातल्याची माहिती आहे. त्यानंतर दोन ते तीन युवकांनी त्याला मारहाण करत धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सागर गंभीर जखमी झाला.

जखमी युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार

हल्ल्यानंतर रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या सागरला स्थानिक नागरिकांनी तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

अंबड पोलिसांकडून तपास सुरू

या घटनेनंतर सावतानगर परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि घटनेत सहभागी असलेल्या युवकांची माहिती मिळवण्यासाठी अंबड पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकर