सटाणा (नाशिक) : महसूल प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या दृष्टीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सटाणा येथे धडक कारवाई करत ब्राह्मणगावच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) मनिषा नारायण बाविस्कर यांना सटाणा तहसील कार्यालयातच १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात (Satana Talathi bribery case in Nashik) पकडले.