दिवंगत शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अनुकंपा नियुक्तीची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करत प्रशासनाने ४० उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण केली होती.
यापैकी एक उमेदवार गैरहजर राहिल्याने त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
तर उर्वरित ३९ पात्र उमेदवारांना १५ ऑगस्ट रोजी नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत.
अनेक वर्षांपासून अनुकंपा नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे.
नोकरी मिळाल्याने या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराचा आधार मिळणार आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
३९ कुटुंबीयांना मिळणार हक्काची नोकरी! १५ ऑगस्टला नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम कसा होणार? पाहा VIDEO.


