भोंदू अरुण पाटील याने दोन आमदारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर येथील या दोन आमदारांना पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवण्यात आल्याचा आरोप आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, एका आमदाराची सव्वाकोटी रुपयांची, तर दुसऱ्या आमदाराची सत्तर लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अरुण पाटील फरार असल्याची माहिती असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणातील आरोपांची आणि आर्थिक व्यवहारांची अधिकृत पुष्टी तपासातून होणे आवश्यक आहे.


