नाशिकच्या पंचवटी परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत 100 ग्रॅम MD ड्रग्स जप्त केले आहेत. सैलानी बाबा चौक परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी रवि भालेराव याच्या घरावर अचानक छापा टाकला. या कारवाईत MD ड्रग्ससह सुमारे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांना संशयित आरोपीच्या घरात MD ड्रग्सचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार अमली पदार्थविरोधी पथकाने कारवाईचे नियोजन करून सैलानी बाबा चौक परिसरात धाड टाकली. छाप्यादरम्यान घराची झडती घेतल्यानंतर 100 ग्रॅम MD ड्रग्स पोलिसांच्या हाती लागले.

या प्रकरणी संशयित आरोपी रवि भालेराव याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाचा स्रोत, त्याचा पुरवठा कोणाकडून होत होता आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

पंचवटी परिसरात झालेल्या या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध साठ्यावर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई केल्याचे समोर आले आहे.