शहरातील अतिक्रमणांविरोधात नाशिक महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. पंचवटी आणि सातपूर विभागात संयुक्त मोहीम राबवत आडगाव नाका परिसरातील अनधिकृत टपऱ्या, शेड आणि हातगाड्यांवर कारवाई करण्यात आली.
शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


