किसान सभेच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. किसान सभेला मुंबईत चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आले असून, सायंकाळी चार वाजता ही बैठक होणार आहे.

या बैठकीला सहा मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती किसान सभेचे अजित नवले यांनी दिली. किसान सभेने बैठकीच्या निमंत्रणाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी किसान सभेचे ‘लाल वादळ’ कसारा घाटातून पुढे रवाना झाले आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, सरकारसोबत होणाऱ्या चर्चेत कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.