नाशिकच्या त्र्यंबक नाका सिग्नल परिसरात काल रात्री तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. रिक्षात प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादातून दगडाने मारहाण करून तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी गुंडाविरोधी पथकाने पवन पाटील आणि राहुल सोनावणे या दोघांना ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, जखमी तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.