नाशिकच्या पेठ तालुक्यात आज सकाळी ९ वाजता सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले.
गोंदे, करंजाळी, भायगाव, देवगाव, आडगाव भुवन आणि एकदरे परिसरात जमीन हादरल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
अचानक जाणवलेल्या धक्क्यांनंतर काही नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर आले.
सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.
तसेच मोठी वित्तहानी, इमारतींची पडझड किंवा इतर गंभीर नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.
भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी आणि अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांमधून पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
ब्रेकिंग न्यूज
ब्रेकिंग
पेठ तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी नाही
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
ब्रेकिंग न्यूज
Breaking News | दिलीप गावितने पटकावले तिसरे सुवर्णपदक
ब्रेकिंग न्यूज
सातपूरमध्ये सिटीलिंक बस अपघाताची पुनरावृत्ती; सलग दुसऱ्या दिवशी घटना, नागरिक संतप्त
ब्रेकिंग न्यूज
टायगर श्रॉफवरील हल्ला प्रकरणात मोठी अपडेट! आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी
ब्रेकिंग न्यूज
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक दौऱ्यासाठी तीन हेलिकॉप्टर; लँडिंगची चाचपणी सुरू
ब्रेकिंग न्यूज
गोल्फ क्लब आणि ईदगाह मैदानासाठी नाशिककरांचे आंदोलन; व्यावसायिक वापराला विरोध


