भोंदू बाबा चमत्कारांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक कशी करतात ? त्यांच्या कथित चमत्कारांमागील युक्त्या नेमक्या काय असतात ? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून अशा फसवणुकीच्या पद्धती समजावून सांगितल्या. या विशेष संवादात त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून कथित चमत्कार कसे घडवून आणले जातात, नागरिकांचा विश्वास कसा संपादन केला जातो आणि श्रद्धेचा गैरफायदा कसा घेतला जाऊ शकतो, हे स्पष्ट केले. अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि कोणत्याही चमत्काराच्या दाव्याची चिकित्सकपणे तपासणी करावी, यासाठी हा संवाद नक्की पाहा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, Share करा आणि ‘आपलं नाशिक’ YouTube चॅनेल Subscribe करा. आपलं नाशिक | आपला आवाज, बातमी २४ तास! #भोंदूबाबा #फसवणुकीचेप्रात्यक्षिक #अंधश्रद्धानिर्मूलन #डॉटीआरगोराणे #आपलंनाशिक