नाशिकच्या तपोवन भूमीला लाभलेली संत-साधूंची समृद्ध परंपरा, अध्यात्माचा मार्ग आणि भक्तीचा अखंड प्रवाह... ‘आपलं नाशिक’च्या City Guest कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपण संवाद साधत आहोत संतोष गिरी महाराज यांच्याशी. संत जनार्दन स्वामी महाराजांची परंपरा, आश्रमाची आध्यात्मिक वाटचाल, तपोवन परिसराचे महत्त्व आणि कुंभमेळ्याच्या साधू परंपरेशी असलेले नाते याविषयी संतोष गिरी महाराज आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. तपोवन हा केवळ एक आश्रम नसून संत परंपरा, साधना आणि भक्तीचा केंद्रबिंदू कसा बनला, वैष्णव परंपरेचा प्रवाह कसा पुढे चालत आला आणि या भूमीचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, याचा विशेष उलगडा या भागात होणार आहे. नाशिकच्या अध्यात्मिक ओळखीचा एक वेगळा पैलू जाणून घेण्यासाठी हा विशेष संवाद नक्की पाहा. फक्त आपलं नाशिकवर... आपला नाशिक, आपला आवाज! #CityGuest #AaplaNashik #TapovanNashik #SantoshGiriMaharaj #SantJanardanSwamiMaharaj