इगतपुरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. भावली धरणाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. काही गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.