मढी येथे कानिफनाथांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या सिन्नर तालुक्यातील चौघांच्या कारला सोनईजवळ अपघात झाला. उसाच्या ट्रॅक्टरला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली.
या दुर्घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला असून, चालक जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


