उपवासासाठी हटके आणि चविष्ट रेसिपी! ‘द होम शेफ, आपलं नाशिक’च्या खास भागात आज आपण बनवणार आहोत रताळा, मखाना आणि गुलकंद लाडू. उपवासाच्या दिवसांसाठी पौष्टिक आणि चवीला भन्नाट असा हा गोड पदार्थ घरच्या घरी सहज तयार करता येतो.
लिंक रोड येथील अनुश्रया नगरमध्ये या खास रेसिपीची माहिती घेण्यात आली. रताळं, मखाना आणि गुलकंद यांचा अनोखा संगम असलेले हे लाडू उपवासाच्या मेन्यूमध्ये नक्कीच एक वेगळी चव आणू शकतात.
रताळा-मखाना गुलकंद लाडू बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते? ते कसे तयार करायचे? आणि या रेसिपीची सोपी पद्धत काय आहे? जाणून घेण्यासाठी पाहा ‘द होम शेफ, आपलं नाशिक’चा हा खास भाग.
उपवासासोबतच घरातील इतर सदस्यांसाठीही ही स्वादिष्ट रेसिपी नक्की ट्राय करता येईल. कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या या लाडूंची रेसिपी तुम्हालाही आवडेल.
आपलं नाशिक | आपला आवाज


