त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा गावालगतच्या राजवीर पाडा येथे बिबट्याने बालकावर हल्ला केला. रोहित लालू वाडघे हा चौथीत शिकणारा विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर त्र्यंबकेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आपलं नाशिक | आपला आवाज