मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकात लोकलच्या धडकेत २२ वर्षीय साहिल थिटे याचा मृत्यू झाला आहे. कॉम्प्युटर क्लासवरून घरी परतत असताना फलाट क्रमांक चारवर ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. साहिल बीकॉमच्या शेवटच्या वर्षात शिकत होता.
या घटनेनंतर साहिलच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. तसेच कुटुंबीयांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. साहिलच्या पश्चात दोन बहिणी असून, त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नातेवाईक आणि शेजाऱ्यांनीही रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.


