अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील जय हिंद चौकातील एका सायकल दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. अग्निशमन दलाची दुसरी गाडी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या घटनेत दुकानाचे किती नुकसान झाले, याची माहितीही अद्याप समोर आलेली नाही. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येते का, याकडे लक्ष लागले आहे.


