मुंबईत मध्य रेल्वेची लोकल वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुलुंड ते ठाणे आणि कांजूरमार्ग ते भांडुपदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने लोकल सेवांवर परिणाम झाला आहे. अप आणि डाउन मार्गावरील जलद तसेच धीम्या लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत.
लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात झालेल्या बदलांमुळे प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी एक्स्प्रेस गाड्यांमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. रेल्वे वाहतुकीतील या बिघाडामुळे प्रवाशांच्या प्रवासाचे नियोजन प्रभावित झाले आहे.


