कल्याण : मुंबई उपनगरीय रेल्वेतील गर्दी आणि जीवघेण्या प्रवासाचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. दिवा–सीएसएमटी लोकलमधील एका महिलेचा थरारक बचावाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित महिला लोकलच्या दारात लटकलेल्या अवस्थेत दिसत आहे. धावत्या गाडीमधून प्रवास करत असताना तिची साडी रेल्वे पुलाच्या खांबाला घासल्याचे दिसून येते. काही क्षणांसाठी मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि महिला थोडक्यात बचावली.
या घटनेनंतर मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशांची सुरक्षितता आणि दररोज जीव धोक्यात घालून होणारा प्रवास पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
दरम्यान, हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.


