नाशिक : रामकुंडाजवळील चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात यंदा १३ दिवसांचा नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रविवार, ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या उत्सवाची सांगता शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाने होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पारंपरिक रावणदहन यंदाही मुख्य आकर्षण ठरणार आहे.
उत्सव काळात दररोज काकडा आरती, सुप्रभात व्यंकटेश स्तवन, कालमापूजन, शृंगार आरती, अभिषेक, बालभोग आणि पारायण आदी धार्मिक कार्यक्रम होतील. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता भगवान श्री व्यंकटेश बालाजी यांची श्रीदेवी व भूदेवी यांच्यासह शहर परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता श्री व्यंकटेश बालाजी महोत्सव होईल.
विजयादशमीनिमित्त गोदाघाटावर श्रीराम विजय सोहळा आणि रावणदहनाचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, रावण व विभीषण यांच्या वेशभूषेतील मिरवणूक काढण्यात येणार आहे. महंत कृष्णचरणदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली महंत पितांबरदास महाराज व बालाजी भक्त मंडळातर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
नाशिक शहर
ब्रेकिंग
रामकुंडावर रंगणार भक्तीचा सोहळा; बालाजी मंदिरात १३ दिवस नवरात्रोत्सव | Apla Nashik
शेअर करा:
शेअर
संबंधित बातम्या
नाशिक शहर
गोदावरी नदीपात्रात जिवंत जलस्रोत असल्याचा दावा; रामकुंडासह कुंड काँक्रीटमुक्त करण्याची मागणी
नाशिक शहर
नाशिकमध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद; रविवारीही कमी दाबाने पाणी!
नाशिक शहर
सरकारवाडा हद्दीतील बंगल्यात घरफोडी; बिहारमधील आंतरराज्यीय आरोपीला अटक
नाशिक शहर
नाशिक रोडवरील देवळाली गावात भरदुपारी तीन घरफोड्या; १ लाख १४ हजारांचा ऐवज चोरीला
नाशिक शहर
नाशिकच्या साक्षी चांडकचा देशात डंका! CA इंटरमध्ये संयुक्त प्रथम क्रमांक | Exclusive Interview


