नाशिकच्या साक्षी चांडकने चार्टर्ड अकाउंटन्सी (CA) इंटरमिजिएट परीक्षेत देशात संयुक्त प्रथम क्रमांक मिळवत शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. सप्टेंबर २०२६ मध्ये झालेल्या परीक्षेत साक्षीने ६०० पैकी ५०२ गुण मिळवले. मुंबईचा नील राजेश शाह यानेही समान गुण मिळवल्याने दोघांनी संयुक्तपणे देशात प्रथम क्रमांक पटकावला.
साक्षीच्या या यशामुळे तिचे कुटुंबीय, शिक्षक आणि मार्गदर्शकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कठीण अभ्यासक्रम, सातत्यपूर्ण तयारी आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करून तिने हे यश संपादन केले. तिच्या यशामागील प्रवास जाणून घेण्यासाठी आपलं नाशिकचे प्रतिनिधी विठ्ठल भाडमुखे यांनी साक्षी, तिचे शिक्षक आणि आई-वडिलांशी संवाद साधला.
या विशेष मुलाखतीत साक्षीच्या अभ्यासाच्या पद्धती, परीक्षेच्या तयारीदरम्यान आलेली आव्हाने, तिच्या यशामागील प्रेरणा आणि कुटुंबीयांनी दिलेला पाठिंबा याविषयी जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी तसेच CA क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी साक्षीचा यशस्वी प्रवास प्रेरणादायी ठरणारा आहे.


