हिरावाडीत ‘नाशिकचा सरकार बाप्पा’चं भव्य आगमन; ढोल-ताशांच्या गजरात गणेशभक्तांचा उत्साह
नाशिकमध्ये गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली असून पंचवटीतील हिरावाडी परिसरात ‘नाशिकचा सरकार बाप्पा’च्या भव्य आगमन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचं आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं.
गणरायाची आरती करून भव्य आगमन मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेवक गौरव गोवर्धन, नगरसेवक हेमंत शेट्टी, नगरसेविका जुई प्रणव शिंदे आणि संस्थापक अध्यक्ष मंथन धात्रक यांच्यासह मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते.
आगमन मिरवणुकीत गरीब रथ आणि ढोल-ताशा पथकांनी सहभाग घेतला. ढोल-ताशांच्या गजराने हिरावाडी परिसर दुमदुमून गेला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणेशभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
भव्य आगमन सोहळ्यासाठी परिसरात गणेशभक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. बाप्पाच्या आगमनाने हिरावाडी परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
आपलं नाशिक | आपला आवाज


