नाशिकची शक्ती — ९ देवी, ९ कथा! | भाग ६ — श्री रेणुका माता मंदिर, भगूर | रंग — हिरवा नाशिक जिल्ह्यातील भगूर हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जन्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. याच भगूरमध्ये वसलेलं श्री रेणुका माता मंदिर अनेक भाविकांच्या श्रद्धेचं स्थान आहे. या भागात जाणून घ्या भगूरच्या रेणुका माता मंदिराचं धार्मिक महत्त्व, अष्टभुजाधारी देवीचं स्वरूप, मंदिरासमोरील प्राचीन बारव आणि या देवस्थानाशी जोडलेल्या प्रचलित आख्यायिका. रेणुका माता आणि भगवान परशुराम यांच्याशी संबंधित पौराणिक कथा, मातृत्वाचा सन्मान आणि नवरात्रातील हिरव्या रंगाचा नवचैतन्याचा संदेशही या भागात उलगडणार आहे. श्रद्धा, इतिहास, परंपरा आणि संस्कृती यांचा संगम अनुभवण्यासाठी संपूर्ण भाग पाहा. अशाच धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाच्या कथा पाहण्यासाठी आपलं नाशिक चॅनलला Subscribe करा. आपलं नाशिक | आपला आवाज… बातमी २४ तास.