नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदाघाट, रामकुंड परिसरातील विकासकामांना वेग आला आहे. ध्वजारोहण सोहळ्यापूर्वी कामे पूर्ण करणे, अतिक्रमणे हटवणे, रस्ते दुरुस्ती आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रशासनासमोर आव्हान आहे.