पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प नेमका कुठे अडला? GMRTमुळे मार्ग बदलला; जाणून घ्या संपूर्ण कहाणी

नाशिक आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची आणि वेगाने विकसित होणारी शहरं आहेत. नाशिकचं कृषी आणि औद्योगिक क्षेत्र, तर पुणे हे शिक्षण, आयटी आणि उद्योगांचं मोठं केंद्र म्हणून ओळखलं जातं. या दोन्ही शहरांना थेट आणि जलद रेल्वेने जोडण्यासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी योजना पुढे आली.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाच्या मार्गात विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. कधी मूळ मार्ग, तर कधी पर्यायी मार्ग अशा चर्चांमुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरला तो खोडद आणि नारायणगाव परिसरातील GMRT अर्थात Giant Metrewave Radio Telescope. रेडिओ दुर्बिणीच्या संवेदनशीलतेमुळे रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित आखणीत बदल करण्याची गरज निर्माण झाल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मूळ मार्गाऐवजी पर्यायी मार्गाचा विचार पुढे आला.

दरम्यान, आता पुन्हा मूळ मार्गाबाबत चर्चा सुरू झाल्याने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला नव्याने गती मिळणार का, याकडे नाशिक आणि पुणे या दोन्ही शहरांचं लक्ष लागलं आहे.

GMRT मुळे मूळ मार्गात बदल का करण्यात आला? पर्यायी मार्ग कोणता आहे? प्रकल्पाची आतापर्यंतची वाटचाल काय आहे? आणि पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रत्यक्षात कधी धावणार? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहा आपलं नाशिकचा हा विशेष रिपोर्ट.

आपलं नाशिक | आपला आवाज