🌸 कास पठाराची रंगीबेरंगी सफर; निसर्गाच्या सान्निध्यात ‘चला सहलीला’ची खास भटकंती

सप्टेंबर महिना सुरू झाला की महाराष्ट्रातील निसर्गप्रेमींना वेध लागतात ते कास पठाराच्या रंगीबेरंगी सौंदर्याचे. पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि विविध रंगांची फुले यामुळे कास पठार पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते. याच निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी ‘आपलं नाशिक’च्या ‘चला सहलीला’ या विशेष ट्रॅव्हल शोमधून कास पठाराची सफर करण्यात आली आहे.

या खास भागात कास पठारासोबत साताऱ्याचा ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्लाही पाहायला मिळणार आहे. निसर्ग आणि इतिहासाचा सुंदर संगम असलेल्या या सफरीत पर्यटकांना प्रवासाचे नियोजन करण्यासाठी आवश्यक असलेली महत्त्वाची माहितीही देण्यात आली आहे.

नाशिक, मुंबई किंवा पुण्याहून कास पठारावर जायचं कसं? प्रवासासाठी किती वेळ लागू शकतो? खर्च किती येऊ शकतो? राहण्याची व्यवस्था कशी आहे? तसेच कास पठारावर पोहोचल्यानंतर आसपासची कोणती ठिकाणं आवर्जून पाहायला हवीत, याबाबतची माहिती या भागात जाणून घेता येणार आहे.

नाशिकहून कास पठाराकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी रस्ते मार्गाचा पर्याय सोयीचा ठरतो. सातारा शहरात पोहोचल्यानंतर कास पठाराकडे जाणाऱ्या मार्गावर निसर्गाचं बदलत जाणारं रूप अनुभवायला मिळतं. शहराची लगबग मागे पडत जाते आणि हिरव्यागार डोंगररांगा, धुके आणि फुलांनी सजलेलं पठार पर्यटकांचं लक्ष वेधून घेतं.

कास पठाराची ही रंगीबेरंगी सफर, अजिंक्यतारा किल्ल्याचा ऐतिहासिक अनुभव आणि प्रवासाचं संपूर्ण नियोजन जाणून घेण्यासाठी ‘चला सहलीला’चा हा विशेष भाग नक्की पाहा.

📞 संपर्क : 8087476283

📰 आपलं नाशिक | आपला आवाज