रोजच्या त्याच त्या धावपळीचा, ट्रॅफिकचा आणि चार भिंतींमधील रुटीनचा कंटाळा आला आहे का? मग टेन्शनला लावा कुलूप, बॅग पॅक करा आणि तयार व्हा एका भन्नाट प्रवासासाठी! ‘चला सहलीला’ या खास कार्यक्रमातून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील सुंदर, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांची अनोखी सफर अनुभवता येणार आहे.

इतिहासाच्या दडलेल्या पानांपासून ते निसर्गाच्या कुशीत लपलेल्या अप्रतिम वाटांपर्यंत अनेक रोमांचक ठिकाणांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. किल्ले, ऐतिहासिक वास्तू, निसर्गरम्य ठिकाणे, पर्यटनस्थळे आणि प्रवासातील भन्नाट अनुभव यांचा खास संगम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ही केवळ दूरवरून पर्यटनस्थळे पाहण्याची सफर नाही, तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील वातावरण, इतिहास, निसर्ग आणि प्रवासाचा खरा अनुभव जाणून घेण्याची संधी आहे. प्रत्येक भागात नवीन ठिकाण, नवीन अनुभव आणि प्रवासाची नवी कहाणी प्रेक्षकांसमोर येणार आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांपासून ते देशातील विविध भागांपर्यंतचा हा प्रवास मनोरंजनासोबतच पर्यटनप्रेमींना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

तर मग तयार आहात ना सहलीला जायला?

📺 पाहा ‘चला सहलीला’
🗓️ दर शनिवार
⏰ सकाळी ९:३० वाजता आणि रात्री ८:३० वाजता