Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: आजघडीला महाराष्ट्रात सर्वेक्षण केले तर मुख्यमंत्रि‍पदासाठी इतर कोणापेक्षाही एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती मिळेल, असे वक्तव्य शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर भाजपकडून (BJP) पहिला पलटवार करण्यात आला आहे. भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांनी बच्चू कडू यांना नौटंकीछाप म्हणत त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. ते रविवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Politics news)

ज्यांना स्वतःच्या मतदारसंघाची नस ओळखता आली नाही, त्या नौटंकी छाप बच्चू कडू यांना महाराष्ट्र कधीपासून कळायला लागला? आता नोकरी दिली आहे तर मालकाचे गुणगान करणे त्यांना अनिवार्य आहे. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघाने नाकारले त्यांनी आधी स्वतःचा किल्ला सांभाळावा, मग महाराष्ट्राबद्दल बोलावे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता शेंबडे पोरही सांगेल, पण तुमची नोकरी ती लोकप्रियता तुम्हाला दिसू देणार नाही, अशी टीका शिवराय कुळकर्णी यांनी केली.

Bacchu Kadu: बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?

"महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचेच नाव मुख्यमंत्रिपदासाठी समोर येईल. कायम सर्वसामान्य जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधिलकीमुळे मलाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे. यासाठी देवाला कशाला साकडे घालू, आता आम्ही थेट जनतेला साकडे घालू,", असे वक्तव्य बच्चू कडू यांनी पंढरपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात असणाऱ्या सुप्त स्पर्धेविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या आंदोलनाबाबत बच्चू कडू काय म्हणाले?

मनोज जरांगे यांनी 30 मे पासून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्रे देण्यात यावीत आणि सातारा गॅझेटियरची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याची घोषणा केली. याविषयी बच्चू कडू यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, "आपण कोणत्याही जातीपातीच्या आंदोलनात आता सहभागी होणार नसल्याचे ठरविले आहे. शेतकरी आणि विकलांग हे सर्व जातींमध्ये असल्याने कोणत्याही एका जातीत न अडकता व्यापक विचार ठेवत आपण यापुढे कोणत्याही जातीच्या आंदोलनात सहभागी होणार नाही," असे बच्चू कडू म्हणाले.