नाशिक महापालिकेच्या विविध स्मशानभूमींमध्ये काम करणाऱ्या मातंग समाजातील महिलांनी आमदार देवयानी फरांदे यांची भेट घेतली.

स्मशानभूमीतील राखेतून मिळणाऱ्या सोन्याचे प्रमाण कमी झाल्याने महिलांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेत सामावून घेऊन दरमहा मानधन देण्यात यावे, अशी मागणी महिलांनी केली.

महिलांच्या मागण्यांबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले असून, हा प्रश्न महापालिका प्रशासनासमोर मांडला जाणार आहे.