सातपूरच्या जाधव संकुलातील नागरिक गेल्या पंधरा दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याच्या समस्येने त्रस्त आहेत. गणेशोत्सवाचा उत्साह सुरू असताना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने महिलांनी संताप व्यक्त केला आहे. दोन दिवसांत समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.