गणेशवाडी फुल बाजाराशेजारी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या कॉम्प्लेक्सची सध्या दुरवस्था झाल्याचे चित्र आहे. कॉम्प्लेक्समध्ये कचरा आणि अस्वच्छतेचे साम्राज्य असल्याचे दिसून येत आहे.

 

 

यासोबतच रस्त्यावरच फुल विक्री होत असल्याने परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही कायम आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या या महापालिका कॉम्प्लेक्सच्या देखभालीचा आणि परिसरातील व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.