आदिवासी विद्यार्थ्यांचे गेल्या दीड महिन्यापासून विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली; मात्र या चर्चेत समाधान न झाल्याने आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.