नाशिक : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन अद्याप सुरूच आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे आंदोलनाच्या पुढील वाटचालीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’चे दिपके आज आदिवासी आंदोलनकर्त्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीमुळे प्रशासकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर दिपके नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागलं आहे.

गोल्फ क्लब परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. आंदोलन सुरू असताना परिसरातील परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

आता दिपके यांच्या भेटीनंतर विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत काय चर्चा होते आणि आंदोलनाला कोणतं नवं वळण मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपलं नाशिक | आपला आवाज