नाशिकच्या कालिका मंदिरात सकल मराठा समाजाच्या समन्वयकांची बैठक सुरू झाली आहे. राज्यभरातील समन्वयक आरक्षणाच्या लढ्याबाबत चर्चा करत असून, १० टक्के आरक्षणाला घटनात्मक संरक्षण, सारथी, अण्णासाहेब महामंडळ, शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवरील गुन्ह्यांवर मंथन होणार आहे.