श्रावणी सोमवार आणि एकादशीचा योग आल्याने पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी मंदिर परिसरात लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

कपालेश्वर संस्थानच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री बारा वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत.

मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाकडून आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे.

दीड लाख भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.