नाशिकच्या लाखलगाव परिसरात रस्त्याच्या वादातून मुठाळ आणि दराडे कुटुंबांत हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत राजेंद्र मुठाळ गंभीर जखमी झाल्याची माहिती असून, त्यांच्या पत्नीसह तीन मुलींनाही मारहाण केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचा दावा मुठाळ कुटुंबाने केला असून, तातडीने अटकेची मागणी केली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


